Satara Crime: खंडाळ्याच्या यात्रेत दोघांवर फायरिंग; मुख्य संशयित पसार

दोन अल्पवयीन मुले ताब्यात
Gun Firing
Gun FiringPudhari
Published on
Updated on

खंडाळा : खंडाळा यात्रेत मध्यरात्रीच्या सुमारास किरकोळ कारणावरून बाचाबाची होऊन फायरिंग करण्यात आली. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी गतीने सूत्रे हलवत फायरिंग करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेची नोंद खंडाळा पोलिस ठाण्यात झाली होती. दरम्यान, या घटनेमुळे यात्रेला गालबोट लागलेे.

आशुतोष ऊर्फ बट्या संतोष जाधव (रा. साखरवाडी, ता. फलटण) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयित आशुतोष हा साखरवाडी गावातच असताना त्याने त्याच्याजवळील असणारी पिस्तूल काही जणांना दाखवली होती. यानंतर नागरिकांनी याची माहिती फलटण पोलिसांना दिली. संशयित आशुतोष हा खंडाळा यात्रेत गेल्यानंतर फलटण पोलिसांनी खंडाळा पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी यात्रेत संशयिताची शोधाशोध केली. याचदरम्यान मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली.

खंडाळा गावच्या वार्षिक यात्रेनिमित्त सुमित प्रदीप पवार (वय 15) व राजवीर नामदेव शिंदे हे यात्रेत तमाशा बघून रात्री घरी जात होते. यावेळी त्यांचा धक्का आशुतोष याला लागला. यावरून तिघांमध्ये बाचाबाची झाली. या रागातूनच आशुतोष याने पिस्तूल काढून सुमित व राजवीर यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये सुमितच्या पोटात व राजवीरच्या खुब्यावर गोळी लागली. गोळीबार केल्यानंतर आशुतोष व त्याच्या साथीदारांनी पलायन केले. या गोळीबारानंतर यात्रेत पळापळ झाली. या पळापळीत तिघांपैकी एकाला नागरिकांनी जाग्यावरच पकडले तर दोघे पसार झाले.

यानंतर जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आशुतोष व त्याच्या साथीदाराने खंडाळ्यातून पळ काढल्यानंतर खंडाळा आणि फलटण ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे घटनेनंतर अवघ्या काही तासातच अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, आशुतोष व त्याच्या साथीदारांवर यापूर्वीही मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news