Satara News : केळघर घाट पाच दिवसांनंतर खुला

वाहनधारकांनी सतर्कता बाळगून प्रवास करावा; बांधकाम विभागाचे आवाहन
Satara News
केळघर घाट पाच दिवसांनंतर खुला
Published on
Updated on

केळघर : मेढा - महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाट रविवारपासून अखेर वाहतुकीसाठी खुला झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी घाट खुला करण्यात आला.

मागील आठवड्यात केळघर परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे केळघर घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे २८ जुलैपासून सुरक्षेच्या कारणास्तव घाट सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने १ ऑगस्ट रोजी घाट परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर वरोशी तसेच काळा कडा परिसरात रस्ता बंद करण्यासाठी टाकण्यात आलेले दगड-मातीचे ढिगारे हटवून घाट वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले असून तहसीलदार तसेच जावली–महाबळेश्वर आपत्ती व्यवस्थापन समितीला याची माहिती देण्यात आली आहे.

प्रसिद्धीपत्रकात एसटी बस तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, तसेच काळा कडा परिसरातील संभाव्य दरडप्रवण भागात वाहने जास्त वेळ थांबवू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. केळघर घाटातून प्रवास करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांनी सतर्कता बाळगून प्रवास करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news