Satara Accident: काशीळमध्‍ये दुचाकी अपघातात एकाचा मृत्‍यू

दुसरा युवक जखमी
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

वेणेगाव : काशीळ, ता. सातारा येथील हद्दीत महामार्गावर एका हॉटेलसमोर शुक्रवारी दुपारी झालेल्‍या अपघातात एका युवकाचा मृत्‍यू झाला तर दुसरा युवक जखमी झाला.

महामार्गावर दुचाकी घसरून दोघेही महामार्गाच्‍या कडेला फेकले गेले. यावेळी लोखंडी ग्रीलला धडकून एकजण ठार झाला. प्रथमेश नारायण जाधव (वय २२, रा. विजयनगर, पो. सुपने, ता. कराड) असे मृत्‍यू झालेल्‍या युवकाचे नाव आहे.

दुचाकीचालक जयंत रामचंद्र जाधव (वय २५) हा युवक जखमी झाला आहे. प्रथमेश व जयंत हे दाेघे दुचाकीवरून निघाले होते. काशीळ हद्दीत आले असता त्‍यांची दुचाकी घसरली. यामध्‍ये दोघेही महामार्गाच्या कडेला फेकले जाऊन सुरक्षेसाठी लावलेल्या लोखंडी ग्रीलला धडकले. यामध्‍ये प्रथमेशच्‍या डोक्‍याला जबर दुखापत झाल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news