Kas Plateau Wildlife : कास पठारावर आढळला दुर्मीळ आकर्षक युरोपियन नीलकंठ

स्थलांतरित पक्ष्यांच्या नोंदीमुळे कासच्या समृद्ध जैवविविधतेवर पुन्हा प्रकाश
European Roller
European Roller
Published on: 
Updated on: 
सागर गुजर

सातारा : जागतिक नैसर्गिक वारसा लाभलेल्या कास पठारावर युरोपियन नीलकंठ (युरोपियन रोलर) हा आकर्षक स्थलांतरित पक्षी आढळला आहे. पर्यावरण अभ्यासक गणेश सातव यांनी या पक्ष्याची नोंद केली असून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी येथे वरिष्ठ प्रोग्रॅम ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले नंदकुमार दुधे यांनी पक्ष्याची ओळख निश्‍चित केली. या दुर्मीळ निरीक्षणामुळे कास पठारावरील समृद्ध पक्षीवैविध्य समोर आले आहे.

साताऱ्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेले कास पठार रंगीबेरंगी रानफुले, दुर्मीळ वनस्पती आणि समृद्ध जैवविविधतेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. २०१२ मध्ये पश्‍चिम घाटाचा युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसास्थळांच्या यादीत समावेश झाला. त्यामुळे कास परिसराला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे.

युरोपियन नीलकंठाचे शास्त्रीय नाव कोरॅसिस गॅर्‍युलस असे आहे. युरोप आणि मध्य आशियातील प्रदेशांत प्रजनन करणारा हा पक्षी हिवाळ्यात आफ्रिकेकडे स्थलांतर करतो. स्थलांतराच्या प्रवासादरम्यान भारतातील विविध भागांतही त्याचे दर्शन होऊ शकते. निळसर-फिरोजी रंगाचे शरीर आणि तांबूस-तपकिरी पाठ ही या पक्ष्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. आकर्षक रंगसंगतीमुळे पक्षी निरीक्षकांसाठी हा पक्षी आकर्षण ठरतो.

भारतात आढळणाऱ्या इंडियन रोलरला मराठीत नीलकंठ म्हणून ओळखले जाते. मात्र, इंडियन रोलर आणि युरोपियन रोलर हे वेगवेगळे पक्षी आहेत. दोन्ही पक्षी एकाच कुळातील असले, तरी त्यांचे भौगोलिक वितरण आणि रंगछटा वेगवेगळ्या आहेत. इंडियन रोलर हा भारतात आढळणारा पक्षी आहे, तर युरोपियन रोलर हा स्थलांतरित पक्षी असून, त्याचे भारतातील दर्शन नोंदीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news