Kas Plateau : कासचे ऑनलाईन बुकिंग सुरू; सुट्टीच्या दिवशी ऑफलाईन पर्यटकांना मनाई

प्रवेश शुल्क २०० रुपये
Kas Plateau
Kas Plateau
Published on
Updated on

बामणोली : जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरवलेल्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम १ सप्टेंबरपासून सुरु करण्यात येणार असून, प्रवेश शुल्क २०० रुपये आकारण्यात येणार आहे. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी फक्त ऑनलाईन बुकिंग केलेल्या पर्यटकांनाच पठारावर प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी ऑफलाईन पर्यटकांना मनाई केली जाणार आहे. दरम्यान, ऑनलाईन बुकिंग कास पठाराच्या अधिकृत www.kas.ind.in या वेबसाईटवर सुरू करण्यात आले आहे.

कास पठारावर सद्यस्थितीत चवर फुलांचा बहर पर्यटकांना आकर्षित करत आहे. मात्र पठारावर येणाऱ्या पर्यटकांसाठी आता प्रवेश शुल्क दोनशे रुपये आकारले जाणार असून यामध्ये पार्किंग मोफत, पार्किंगपासून कास पठारापर्यंत बस सेवा मोफत, प्रति ग्रुप एक माहिती पत्रिका मोफत, कास पठारावरील एकीव वॉच टॉवर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या दुर्बीणमधून कण्हेर जलाशय व परिसराचे दर्शन मोफत पाहता येणार आहे.

कुमुदिनी तलाव वॉच टॉवर येथून दुर्बीणमधून कास तलाव परिसर दर्शन मोफत पाहता येणार आहे. तसेच राजमार्ग ते कुमुदिनी तलाव इलेक्ट्रिक बस करता प्रति व्यक्ती ये-जा करण्यासाठी शंभर रुपये शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी शनिवार, रविवार व इतर सुट्टीचे दिवस वगळता ४० रुपये प्रति विद्यार्थी शुल्क आकारले जाणार आहे. मात्र संबंधित प्राचार्यांचे पत्र आवश्यक आहे. गाईड शुल्क दोनशे रुपये असून किमान दहा लोकांच्या ग्रुप करिता एका तासासाठी हे शुल्क आकारले जाणार आहे. ऑनलाईन फक्त तीन हजार लोकांची मर्यादा असून माहिती पत्रिका वरील सूचनांचे पर्यटकांनी पालन करावे, असे आवाहन सातारा वनविभाग व कास पठार सहा गाव संवर्धन समितीकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news