Satara leopard sighting : करवडी शिवारात बिबट्याची दहशत

वडोली निळेश्वर येथे जनावरांवर हल्ला ;वनविभागाकडून खबरदारीचे आवाहन
Satara leopard sighting
Satara leopard sightingPudhari
Published on
Updated on

कराड : करवडी (ता.कराड) येथे कॅनॉललगत शिवारात शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. तसेच वडोली निळेश्वर येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवडीचा मृत्यू झाला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करवडीत कॅनाल लगत उत्तम डुबल यांच्या शेतात बिबट्या निदर्शनास आला. त्यानंतर अमोल पाटील व प्रशांत माने यांच्या घराजवळ त्याचा वावर आढळला. अमोल पाटील यांच्या शेतामध्ये बिबट्याचे ठसेही दिसून आले आहेत. तर वडोली निळेश्वर येथील निळेश्वर मंदिरालगत असलेल्या सुरेश पवार यांच्या वस्तीवरील जनावरांवर हल्ला करून बिबट्याने शेडमधील कालवड ठार केले.

दरम्यान वनरक्षक सानिका घाटगे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पावलांचे ठसे, नखांचे खुणा आणि हल्ल्याची पद्धत पाहता हा हल्ला बिबट्याचाच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे शेतकरी व शेतमजूर वर्गात भीती निर्माण झाली असून शेतात काम करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भुकेमुळे बिबट्या लोकवस्तीत येऊ लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news