Satara News : कास पठारावर फुलोत्सवाची चाहूल

चवर फुलांच्या बहराने पर्यटकांची पावले वळली : रंगीबेरंगी फुलांचे आगमन
Kaas Plateau
कास पठार
Published on
Updated on

बामणोली : सातारा जिल्ह्याचे नैसर्गिक वैभव असलेल्या कास पुष्प पठारावर यंदाच्या फुलोत्सवाची चाहूल लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पठारावरील वातावरण अधिकच अल्हाददायक झाले असून, सध्या चवर फुलांचा बहर पहायला मिळत आहे. त्याचबरोबर विविध रंगांची छोटी-मोठी रानफुलेही उमलू लागल्याने कासचा निसर्ग पुन्हा एकदा विविध रंगछटांनी नटू लागला आहे. दरम्यान, रविवारी विकेंडला पर्यटकांची पठारावर गर्दी झाली होती.

शनिवार-रविवार सलग सुट्टी आणि अल्हाददायक पाऊस यामुळे राज्याच्या विविध भागांतून पर्यटकांची पावले कास पठारावर पडू लागली आहेत. रिमझिम पाऊस, दाट धुके, थंडगार वारा आणि परिसरातील ओसंडून वाहणारे धबधबे यांचा मनमुराद आनंद पर्यटक लुटताना दिसत आहेत. चवर फुलांच्या बहराने कास पठारावर फुलोत्सवाची अधिकृत चाहूल लागली असून, येत्या काही दिवसांत संपूर्ण पठार विविधरंगी रानफुलांनी बहरून पर्यटकांना अनोखी निसर्गसफर अनुभवायला मिळणार आहे.

फुलोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वनविभाग आणि कास व्यवस्थापन समितीने पूर्वतयारीला वेग दिला आहे. पर्यटकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि समिती सदस्य नियोजनबद्ध काम करत आहेत. संपूर्ण पठारावर संरक्षक जाळी बसविण्याचे काम महिनाभरापूर्वीच पूर्ण झाले असून, पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहतूक नियोजन, मार्गदर्शन आणि सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. विशेषतः शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना पर्यटकांचे नियोजन करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news