

सातारा : रॉयल कॅरिबियन क्रुझवर किचन फुड ॲन्ड बेवरीजमध्ये नोकरी लावतो असे सांगून तिघांना ९ लाख ५२ हजार रुपयांना फसवले. ओम प्रवीण जाधव (रा. जुना आरटीओ चौक, सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
आदित्य तुकाराम पवार (वय २३, रा.आर्वी ता.कोरेगाव) या युवकाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना २०२५ मध्ये घडली आहे. संशयिताने तक्रारदार युवकासह अन्य दोघांना नोकरीचे आमिष दाखवले. रॉयल कॅरिबियन क्रुझवर किचन फुड ॲन्ड बेवरीजमध्ये नोकरी लावतो, असे सांगितले. याठिकाणी नोकरी लागली तर तुमचे कल्याण होईल, असे सांगून प्रत्येकाकडून पैसे घेतले.
मात्र पैसे घेवून देखील नोकरी लावली नाही. यामुळे तक्रारदारासह इतरांनी पैसे मागितले. मात्र संशयिताने ते पैसे देण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याने अखेर तक्रारदार यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.