

सातारा : एका मोकाट कुत्र्याने रविवारी दुपारच्या सुमारास 11 हून अधिक मुले, महिला व वृद्ध ग्रामस्थांना चावा घेतल्याने जकातवाडी (ता. सातारा) हादरून गेली. जखमी ग्रामस्थांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले.
जकातवाडी येथे एका मोकाट कुत्र्याने अचानक दिसेल त्याच्या अंगावर धाव घेत चावा घेण्यास व ओरबडण्यास सुरुवात केली. कुत्र्याने पहिला हल्ला अपार्टमेंटखाली खेळणाऱ्या मुलावर केला. दोन मुलींच्या अंगावर जात कुत्रा चावताच मुली भेदरून गेल्या. ही बाब इतर नागरिकांनी पाहिल्यानंतर कुत्र्याने त्यांनाही चावा घेतला. कुत्रा दिसेल त्याला चावा घेत सुटल्याने पीडितांची व बघणाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. सुमारे 15 ते 20 मिनिटे हा थरार सुरू होता.
हात, पाय, तोंड, पाटीचे लचके...
मोकाट कुत्र्याने हात, पाय, तोंड व पाटीचा चावा घेत लचके तोडले. उपचार घेतल्यानंतरही मुले, वृद्ध भीतीच्या छायेतून बाहेर आले नव्हते.