Satara News : कारागृहात बंदीवानाकडे सापडला गांजा

सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Ganja Smuggling Case
कारागृहात बंदीवानाकडे सापडला गांजाPudhari
Published on
Updated on

सातारा: सातारा मध्यवर्ती कारागृहामध्ये संकेत अनंत तारु या बंदीवानाकडे गांजा सापडला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कारागृहात गांजा सापडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

कारागृह पोलिसांनी ही कारवाई दि. 16 मे रोजी केली आहे. सर्कलमधील बंदीवानांची व त्यांच्यासोबत असलेल्या साहित्याची कारागृह पोलिस झडती घेत असतात. 16 मे रोजी त्यानुसार सर्कल क्रमांक 1 व सर्कल क्र 3 मध्ये कारागृह पोलिस बंदीवानांची झडती घेत होते.

संशयित संकेत तारु याची अंगझडती घेत असताना त्याच्या अंर्तवस्त्रामध्ये लपवून ठेवलेल्या दोन पुड्या आढळल्या. यामुळे पोलिसांनी त्या पुड्या ताब्यात घेवून पाहणी केली व त्याबाबत संकेत याला विचारणा केली असता त्याने गांजा असल्याची कबुली दिली. प्राथमिक सर्व माहिती घेतल्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

सातारा शहरासह जिल्ह्यात गांजाचे पेव फुटले आहे. खुलेआम गांजा मिळत असल्याचे वास्तव आहे. कारागृह सारख्या संवेदनशील ठिकाणी बंदीवानाकडे गांजा सापडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गांजा कारागृहात कसा पोहचला? संशयिताला कोणाची मदत मिळाली? गांजासाठी किती रक्कम मोजली गेली? कारागृह प्रशासन याच्या मुळाशी जाणार का? या साखळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news