Satara IT park: आयटी पार्कसाठी 42.55 हेक्टर जमीन एमआयडीसीकडे

मंत्री शिवेंद्रराजेंच्या प्रयत्नांना यश; नागेवाडी येथे पार्क उभारणीचा मार्ग मोकळा
Satara IT park
Satara IT parkPudhari
Published on
Updated on

सातारा : जिल्ह्यातील युवकांना साताऱ्यातच रोजगाराची संधी मिळावी आणि आयटी पार्क व्हावे, यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. नागेवाडी (ता. सातारा) येथील 42 हेक्टर 55 आर एवढी शासकीय जमीन आयटी पार्क उभारण्यासाठी एमआयडीसीकडे वर्ग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

ना. भोसले यांच्या सूचनेनुसार काही दिवसांपूर्वीच सदर जागेची पाहणी एमआयडीसी विभागामार्फत झाली होती. ना. भोसले यांच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत नागेवाडी येथील गट क्र. 308/1 येथील 42 हेक्टर 55 आर एवढे क्षेत्र आयटी पार्कसाठी आरक्षित केले होते. पार्क विकसित करण्याचे काम प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी ही जागा महसूल विभागाकडून एमआयडीसीकडे वर्ग करणे आवश्यक होते. यासाठी ना. भोसले यांचा पाठपुरावा सुरू होता.

त्यांच्या मागणीनुसार बुधवारी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागेवाडी येथील 42 हेक्टर 55 आर एवढे शासकीय क्षेत्र आयटी पार्क विकसित करण्यासाठी एमआयडीसीकडे प्रदान करण्याचा निर्णय झाला. तशी मान्यता राज्याच्या महसूल विभागाने दिली. पुढील कार्यवाही गतीने होण्यासाठी आवश्यक त्या सूचना ना. भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्हावासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.

हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल ना. भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

रोजगाराच्या संधी मिळणार

जिल्ह्यातील आयटी क्षेत्राशी निगडीत इंजिनिअर्स आणि युवक व युवतींना साताऱ्यातच रोजगाराची संधी मिळाली पाहिजे, येथील युवकांना पुणे, मुंबई यासह अन्य राज्यांतील शहरात नोकरीसाठी जावे लागू नये, यासाठी नागेवाडी (लिंब खिंड) येथील शासकीय जागेत आयटी पार्क उभारावा, यासाठी ना. भोसले यांनी अभ्यासपूर्ण पाठपुरावा सुरू केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news