Shivendraraje Bhosale | साताऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणार : ना. शिवेंद्रराजे

सातारा शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले
Shivendraraje Bhosale | साताऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणार : ना. शिवेंद्रराजे
Published on
Updated on

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात क्रिकेटचे खेळाडू मोठ्या संख्येने तयार होत आहेत. या खेळाडूंसाठी तसेच राज्य, राष्ट्रीयस्तरासह रणजी सामने साताऱ्यात खेळले जावेत आणि हे सामने पाहण्याचा आनंद सातारकरांना घेता यावा, यादृष्टीने सातारा शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

सातारा शहरातील ठक्कर सिटीच्या लगत आयुर्वेदिक गार्डन शेजारी सातारा नगर परिषदेच्या मालकीची सुमारे ११ एकर जागा असून या जागेमध्ये सर्व सोयी सुविधांनी युक्त सुसज्ज आणि प्रशस्त असे क्रिकेट स्टेडियम उभारण्याची मागणी जिल्हा क्रिकेटप्रेमींनी ना. शिवेंद्रराजे यांना होती. त्यांच्या मागणीला ना. शिवेंद्रराजे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आज त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, पालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक अविनाश कदम, जयंत महाजनी, इर्शाद बागवान, निशांत गवळी, धैर्यशील भोसले, पिंटू साळुंखे, भालचंद्र निकम यांच्यासह पदाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सातारा शहरात एक दर्जेदार क्रिकेट स्टेडियम असावे, यादृष्टीने आपले प्रयत्न सुरु असून त्याचसाठी प्रस्तावित जागेची पाहणी करण्यात आल्याचे ना. शिवेंद्रराजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने जागेची मोजणी व इतर बाबींचा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचना ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news