

सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये जिल्ह्याचा निकाल 90.89 टक्के लागला. गतवर्षीच्या तुलनेत 1.87 टक्क्याने हा निकाल घसरला. गतवर्षी 92.76 टक्के निकाल लागला होता. जिल्ह्याने यावर्षीही कोल्हापूर विभागात द्वितीय क्रमांक पटकावला. विज्ञान शाखेचा निकाल 97.94 टक्के लागला असून, गुणवत्तेत विज्ञान शाखा यावर्षीही टॉपवर राहिली आहे.
जिल्ह्यात परीक्षेसाठी 32 हजार 135 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 31 हजार 824 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 28 हजार 925 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 90.89 टक्के निकाल लागला. रिपीटरच्या 925 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 913 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 289 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रिपीटरचा निकाल 31.65 टक्के लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी दिली.
जिल्ह्यात विज्ञान शाखेसाठी 18 हजार 324 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी 18 हजार 264 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 17 हजार 889 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 97.94 टक्के निकाल लागला. कला शाखेसाठी 6 हजार 860 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6 हजार 668 विद्यार्थी परीक्षेस होते. त्यापैकी 5 हजार 159 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 77.36 टक्के निकाल लागला. वाणिज्य शाखेसाठी 5 हजार 941 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी 5 हजार 891 विद्यार्थी परीक्षेस होते. त्यापैकी 4 हजार 952 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 84.06 टक्के निकाल लागला.
व्यावसायिक शाखेसाठी 760 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 751 विद्यार्थी परीक्षेस होते. त्यापैकी 705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 93.87 टक्के निकाल लागला. आयटीआय शाखेसाठी 250 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 250 विद्यार्थी परीक्षेस होते. त्यापैकी 220 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 88 टक्के निकाल लागला.