

वाई : वाई-पाचवड मार्गावरील बावधन ओढा येथील पुलाशेजारी गुरुवारी भरधाव वेगात असणार ट्रक एका दुकानात घुसला. यामध्ये एक वृध्द ठार झाला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे.
बाळासाहेब लक्ष्मण पिसाळ (वय ७२) असे अपघातात ठार झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती, वाईहून पाचवडकडे जात असताना एका ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
त्यानंतर ट्रक विरुद्ध दिशेला जाऊन बावधन ओढा परिसरातील ‘किराणा दुकानात घुसला. यामध्ये बाळासाहेब पिसाळ हे गंभीर जखमी झाल्याने ते जागीच ठार झाले. तर बंडा मोहिते हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. या अपघातात लगत असलेली दुचाकी चिरडली गेली. दरम्यान, ट्रक चालक नितीन कांबळे (रा. व्याहळी) हा वाहन चालवत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.