Hind Kesari : साताऱ्यात दि.14 ते 17 मेअखेर हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा

देशातील नामवंत मल्ल होणार सहभागी : थार, ट्रॅक्टर, बुलेट यासह विविध बक्षिसे
Hind Kesari
साताऱ्यात दि.14 ते 17 मेअखेर हिंदकेसरी कुस्ती स्पर्धाFile Photo
Published on
Updated on

सातारा : क्रीडा महर्षी पै. साहेबराव पवार यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत, महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाच्या मान्यतेने राजेश्वर प्रतिष्ठान सातारा व तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे दि. 14 ते 17 मे अखेर 52 व्या हिंदकेसरी पुरुष व महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष सुधीर पवार व निमंत्रक दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हिंदकेसरी स्पर्धेसाठी देशातील नामवंत मल्ल सहभागी होणार असून विजेत्यास थार, ट्रॅक्टर, बुलेट यासह विविध बक्षिसे दिली जाणार आहेत. हिंदकेसरी स्पर्धेसाठी देशातील 28 राज्यांसह रेल्वे, सेनादल, वायूदल, भूदल अशा 8 सेवासंस्थांमधून सुमारे 600 पुरुष व 300 महिला सहभागी होणार आहेत. तसेच महिला राष्ट्रीय पंच व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन कझाकीस्तानचे माजी पंतप्रधान यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी जागतिक कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा चार दिवस चालणार आहे. सुमारे 40 हजार लोकांची बैठक व्यवस्था मैदानात करण्यात आली आहे. तसेच कुस्ती स्पर्धेसाठी 3 मैदाने करण्यात आली आहेत.=

हिंदकेसरी पुरूष 85 किलो ते 140 किलो गटातील प्रथम विजेत्यास थार व चांदीची गदा, द्वितीय क्रमांकास ट्रॅक्टर, तृतीय क्रमांकास बुलेट तर चौथ्या क्रमांकास मोटारसायकल प्रदान करण्यात येणार आहे. वजन गट पुरष 55, 60, 65, 70, 75, 80, 85 किलो गटातील प्रत्येक प्रथम क्रमांकास मोटारसायकल, द्वितीय क्रमांकास 50 हजार रुपये, तृतीय क्रमांकास 20 हजार रुपये, चतुर्थ क्रमांकास 20 हजार रुपये देण्यात येणार आहेत. हिंदकेसरी महिला 65 ते 90 किलो गटातील प्रथम क्रमांकास कार, द्वितीय क्रमांकास स्कूटर, तृतीय क्रमांकास 50 हजार रुपये, चतुर्थ क्रमांकास 25 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

महिला वजनगट 48, 52, 56,62 किलो गटातील प्रत्येक प्रथम क्रमांकास स्कूटर, द्वितीय क्रमांकास 50 हजार रुपये, तृतीय क्रमांकास 20 हजार रुपये, चतुर्थ क्रमांकास 20 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहेत. स्पर्धेसाठी सुमारे 5 कोटी रुपयाहून अधिक खर्च येणार आहे. देशातील, परदेशातील व राज्यातील अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी येणार आहेत. देशाच्या आजवरच्या इतिहासातील पहिली व एकमेव मोठी हिंदकेसरी स्पर्धा साताऱ्यात होणार असल्याचे दीपक पवार व सुधीर पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news