Satara heroin seizure: साताऱ्याजवळ 9 लाखांचे हेरॉईन जप्त

सातारा शहराजवळ तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत कारमधून प्रवास करणाऱ्या दोघांकडून सुमारे 9 लाख रुपये किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले
Satara heroin seizure: साताऱ्याजवळ 9 लाखांचे हेरॉईन जप्त
(File Photo)
Published on
Updated on

सातारा : सातारा शहराजवळ तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत कारमधून प्रवास करणाऱ्या दोघांकडून सुमारे 9 लाख रुपये किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले. संबंधित दोघे कोल्हापूर येथील रहिवासी असून, अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने ते साताऱ्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.

अक्षय पाटील आणि अलंकार (दोघेही रा. कोल्हापूर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. अमली पदार्थ विक्रीसाठी दोघेजण कारने साताऱ्यात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गस्त वाढवून सापळा रचला. सोनगाव परिसरात पांढऱ्या रंगाची संशयास्पद कार आढळताच पोलिसांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना पाहताच संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news