Satara Rain: दाणादाण... कुठे दरड कोसळली तर कुठे झाडे पडली; पावसाने त्रेधातिरपीठ

सखल भाग जलमय : जनजीवन चिंब, पेरण्यांना वेग
Satara Rain
Satara Rain
Published on
Updated on

सातारा : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शनिवारी दाणादाण उडवली. पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये धो धो कोसळणाऱ्या पावसाने दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच असून परळी खोऱ्यात सांडवलीत दरड कोसळली. साताऱ्यात विसावा नाक्यावर भले मोठे झाड पडले. काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असून नद्यांची पाणीपातळी वाढू लागली आहे. साताऱ्यालगत संगम माहुली येथील पातळी काहीअंशी वाढल्याचे चित्र दिसले. जनजीवन चिंब झाले आहे. समाधानकारक पावसामुळे पेरण्यांना वेग आला असून बळीराजा सुखावून गेला आहे.

सदरबझार परिसरात संरक्षक भिंत पडली

साताऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे सदरबझार परिसरात माजी नगराध्यक्ष निशांत पाटील यांच्या निवासस्थान परिसरातील संरक्षक भिंत पडली. संरक्षक भिंत जमीनदोस्त झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले असल्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात आले.

झेडपी अध्यक्ष बंगल्याच्या गेटवर झाड कोसळले

पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील लोखंडी गेटवर गुलमोहराचे महाकाय झाड पहाटेच्यावेळी कोसळले. त्यामुळे लोखंडी गेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे ठिकाण वर्दळीचे आहे. मात्र रात्रीच्यावेळेस झाड पडल्याने जिवित हानी टळली. प्रशासनामार्फत त्वरित झाड हटवण्यात आले असून लोखंडी गेटचे नुकसान झाले आहे.

कृष्णा व वेण्णा नदीच्या पातळीत वाढ

गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. मात्र जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. त्यामुळे कृष्णा व वेण्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. समाधानकारक पातळीसाठ अद्यापही जोरदार पावसाची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news