Satara Groundwater Level : जिल्ह्यात सव्वादोन मीटरने घटली भूजल पातळी

माण, महाबळेश्वर, फलटणमध्ये सर्वाधिक घसरण : भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल
Satara Groundwater Level
Satara Groundwater Level
Published on: 
Updated on: 
प्रवीण शिंगटे

सातारा : जिल्ह्यात भूगर्भातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट होत असल्याची चिंताजनक स्थिती आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने नुकतेच एक सर्व्हेक्षण केले. त्यामध्ये जिल्ह्यातील पाणी पातळी सरासरी २.११ मीटरने घटल्याचे समोर आले, तरीही माण तालुक्यात सर्वाधिक ३.७७ मीटर, महाबळेश्वरमध्ये ३.६८ मीटर आणि फलटण तालुक्यात ३.२६ मीटर घट नोंदवली आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील ११६ निवडक विहिरींच्या पातळीचे नियमित निरीक्षण केले जाते. या निरीक्षणाद्वारे भूजल पातळीतील बदल, पाण्याची उपलब्धता आणि भूजलसाठ्याची स्थितीचा अभ्यास केला जातो. जिल्ह्यातील ११६ विहिरींच्या निरीक्षणातून तालुकानिहाय भूजल पातळीतील घट समोर आली असून पाण्याच्या नियोजनाबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या माण तालुक्यात ३.७७ मीटरची घट नोंदविली. वाई तालुक्यात तुलनेने कमी म्हणजे १.०१ मीटर घट असली, तरी भूजल पातळीतील बदलांकडे सातत्याने लक्ष देण्याची गरज आहे.

भूजल पातळीतील ही घट भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर तसेच शेतीच्या सिंचनावर परिणाम करू शकते. विहिरी, बोअरवेल आणि अन्य भूजल स्रोतांवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबरोबरच पुनर्भरणाचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. पाणी आडवा, पाणी जिरवा, वनराई बंधारे, जलशोषक खड्डे, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि शेततळ्यांसारख्या उपाययोजनांमधून पावसाचे पाणी मुरविण्यावर भर देण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.