Satara News | हिरवा निसर्ग हा भवतीने..जीवन सफर करा मस्तीने...

निसर्ग सौंदर्याचे माहेरघर असणार्‍या पाटणचा निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
Satara News |
Satara News | हिरवा निसर्ग हा भवतीने..जीवन सफर करा मस्तीने...Pudhari Photo
Published on
Updated on

पाटण : ‘हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे...जीवनाचे गीत गारे.. धुंद व्हा रे..या गाण्यांच्या ओळींना साजेसा असा नैसर्गिक आविष्कार सध्या पाटण तालुक्यात सगळीकडे पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणार्‍या या तालुक्यात सीमेवर असणार्‍या सह्याद्री पर्वतरांगांनीही हिरवा शालू परिधान केल्याने पर्यटकांसह सर्वांच्याच डोळ्यांना सुखद आनंद मिळत आहे.

निसर्ग सौंदर्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाटण तालुक्यात प्रामुख्याने कोयना, मोरणा, तारळे, ढेबेवाडी, चाफळ या विभागात वर्षभर निसर्गाचे नानाविध चमत्कार आणि अविष्कार अनुभवायला मिळतात. पर्यटनाची पंढरी म्हणून पाटण तालुक्याचा नेहमीच नामोल्लेख होतो. पावसाळ्यात तर अगदी स्थानिक कोयनेसोबतच छोटी मोठी धरणं, ओझर्डे, सडावाघापूरसह अनेक शेकडो धबधबे पर्यटकांसाठी एक आगळी वेगळी पर्वणी ठरतात.

पावसाळ्यात पावसाच्या माध्यमातून अनेक पर्यटन केंद्र विकसित होतात तर त्यानंतर हिवाळ्यात नानाविध रंगाच्या व जातींच्या फुलांची पठारही बहरलेली याच तालुक्यात अनेक ठिकाणी पहायला मिळतात. याशिवाय अगदी भर उन्हाळ्यातही याच पठारांवर अंजनीच्या अगदी नक्षत्रांसारख्या फुलांनीही पर्यटकांना आकर्षित केलं जातं. निश्चितच सौंदर्याची खाण असलेल्या याच तालुक्यात सध्या ठीक ठिकाणी फिरवायचे नवनवीन अविष्कार पाहायला मिळत असल्याने हजारोंच्या संख्येने पर्यटक पर्यटकांची पावले आपोआपच पाटण तालुक्यात वळली जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news