Satara : ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद कार्यालय असा भव्य मोर्चा
Sangli News
ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Published on
Updated on

सातारा : ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सातारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने सोमवार, दि. 8 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला.

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना किमान वेतन अनुदान वेळेवर मिळावे, सुधारित किमान वेतन दर जाहीर करावा, नवीन वेतनश्रेणी व पेन्शन लागू करावी, वेतनावर 100 टक्के अनुदान द्यावे, जिल्हा परिषद भरतीमध्ये 10 टक्के आरक्षित जागांमध्ये भरती करावी. यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. यासाठीच सातार्‍यात पोवई नाका ते जिल्हा परिषद असा मोर्चा काढण्यात आला. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष प्रा. तानाजी ठोंबरे, सरचिटणीस नामदेव चव्हाण, राज्य सचिव कॉ. शामराव चिंचणे व पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news