सातारा : बाप्पा निघाले...; गणेशभक्त हिरमुसले

भक्तीमय वातावरणात गणरायाला निरोप
Satara Ganesh Visarjan
भक्तीमय वातावरणात गणरायाला निरोप File Photo
Published on
Updated on

सातारा : ‘गणपती बापा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, बाप्पा निघाले गावाला... चैन पडेना आम्हाला’, अशा जयघोषात फुलांची उधळण करत, पारंपरिक वाद्यांच्या निनादात, ढोल-ताशांच्या गजरात अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील सुमारे 800 गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. सातारा शहरातील 64 सार्वजनिक मंडळांचा त्यामध्ये समावेश आहे. तर 26 हजार घरगुती बाप्पांनाही भक्तिभावाने निरोप देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. दरम्यान, सातार्‍यातील मुख्य विसर्जन मिरवणूक मंगळवारी निघणार असून त्याची जय्यत तयारी प्रशासनासह सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

Satara Ganesh Visarjan
सातारा : आईदेखत बंधार्‍यात मूकबधिर मुलगा बुडाला

विघ्नहर्त्या बाप्पांच्या आगमनानंतर 10 दिवस सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी अनंत चतुर्दशीला होत आहे. बाप्पांना निरोप देताना सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांसह गणेशभक्तांनाही हूरहूर लागून राहिली आहे. अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला सोमवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी बाप्पांना भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. मूर्तींच्या विसर्जनासाठी सकाळपासूनच सातारा शहर परिसरातील मंडळांच्या कार्यकर्त्यांबरोबरच घरगुती बाप्पांच्या विसर्जनाची लगबग गणेशभक्तांमध्ये सुरु होती. पालिकेच्यावतीने राजवाडा, बुधवार नाका, प्रतापसिंह शेती फार्मसोबतच गोडोली, सदरबझार व हुतात्मा स्मारक येथील कृत्रिम तळी तसेच संगममाहुली, वेण्णा नदीवरील पूल व परिसरात भाविकांची विजर्सनासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी झाली होती.

शहरातील बहुतांश मंडळांनी सोमवारी डीजेला फाटा देत पारंपारिक वाद्याच्या निनादात ढोलताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुका काढल्या. गुलालाची उधळण करण्यात आली. विसर्जन मार्गांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मिरवणुकीसाठी विविधरंगी फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलींचा वापर करण्यात आला. मिरवणुकीच्या अग्रभागी बँड पथक, ढोल ताशा पथकासह महिला मिरवणूक मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालत होत्या.

बुधवार नाका येथील कृत्रिम तळ्यामध्ये मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी 110 टनाच्या महाकाय क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. या क्रेनच्या सहाय्यानेच सोमवारी रात्री उशीरापर्यंत मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनस्थळी पालिकेतर्फे निर्माल्य कुंड ठेवण्यात आले होते. विसर्जनस्थळी पालिकेच्यावतीने निर्माल्यदान उपक्रम राबवण्यात येत आहे. ठिकठिकाणी विसर्जनस्थळाकडे जाणारे दिशादर्शक फलकही लावल्यामुळे गणेशभक्तांची गैरसोय झाली नाही. पालिकेच्यावतीने ठिकठिकाणी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Satara Ganesh Visarjan
सातारा : पिसाळलेल्या कुत्र्याचा 35 जणांना चावा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news