खेड: पुढारी वृत्तसेवा : साताऱ्यातील बाँम्बे रेस्टॉरंट चौकात फळ विक्रेत्यांची ८ खंडणीखोरांनी रोकड लांबवून फळांची नासधूस केली. याबाबत फळविक्रेत्यांनी प्रतापसिंहनगर येथील खंडणीखोरांची शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, पोलिसांकडून कोणतीच कारवाई झाली नसल्याने फळविक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पोलिसांकडून संबंधित खंडणीखोरांवर कारवाई न झाल्यास आमच्याकडे आत्मदहनाशिवाय पर्याय नसल्याचे फळविक्रेते व हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी रामभाऊ कचरे यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?