Satara Fraud Case: प्लॉट खरेदीच्या नावाखाली हवालदाराकडून फसवणूक

नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत १८ लाख रुपयांची फसवणूक
Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

सातारा : प्लॉट खरेदी करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मयुर हणमंत कणसे (रा. अंगापूर वंदन, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. तर हवालदार सागर दिलीप भुजबळ (रा. अंगापूर वंदन, ता. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ नोव्हेंबर २०२४ पासून ते १२ जून २०२६ या कालावधीत संशयिताने कणसे यांना प्लॉट खरेदी करून त्यातून चांगला नफा मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार कणसे यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, गणेश चौक-कोडोली शाखेतील खात्यातून संशयिताच्या खात्यावर विविध व्यवहारांद्वारे एकूण १८ लाख रुपये ऑनलाईन हस्तांतरित करण्यात आले.

मात्र, संबंधित प्लॉटची खरेदी न करता तसेच घेतलेली रक्कम परत न देता संशयिताने फसवणूक केल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे. याप्रकरणी १२ जून २०२६ रोजी दुपारी १.२७ वाजता सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. अर्जाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news