

सातारा : सातारा शहर परिसर व तालुक्यात दुचाकी चोरी करणार्याला तालुका पोलिसांनी अटक केली. संशयिताकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्व वाहने जप्त केली. रेहान सिकंदर मुलाणी (वय २०, रा. कोडोली, सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मार्च महिन्यात परळी येथून दुचाकी चोरीला गेल्याबाबत पोलिस तपास करत होते. या दुचाकी चोरीबाबत पोलिसांनी कोडोली येथून संशयिताला दुचाकीसह ताब्यात घेतले. संबंधित दुचाकी चोरी केल्याचे सांगून आणखी तीन दुचाकी चोरल्याचेही सांगितले. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २ व सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन असे चार गुन्हे उघडकीस आले.
पोनि निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अभिजीत गुरव, सहाय्यक फौजदार उमेश माने, पोलिस संदिप कर्णे, दादा स्वामी, राजू शिखरे, पंकज ढाणे, मनोज गायकवाड, संदिप पांडव, प्रल्हाद ढाकरे, संदिप आवळे, अभिजीत मोरे, उमेश बगाडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.