Satara Drowning Incident : उरमोडी धरणात बुडून माजी सरपंचाचा मृत्यू

हातपाय धुण्यासाठी उरमोडी धरणात गेले असता पाय घसरून पाण्यात पडल्याची शक्यता
Drowning Incident
Drowning Incident Pudhari Photo
Published on: 
Updated on: 

सातारा : कातवडी, ता. सातारा गावचे माजी सरपंच हणमंत राणू देवरे (वय ५२) यांचा उरमोडी धरणात बुडून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.

हणमंत देवरे मंगळवारी सकाळी वडाचा माळ परिसरात भुईमूग काढण्यासाठी गेले होते. उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने ते हातपाय धुण्यासाठी उरमोडी धरणात गेले असता पाय घसरून पाण्यात पडल्याची शक्यता आहे. ते बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, ते आढळून न आल्याने सातारा तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी श्‍वानपथकाच्या मदतीने शोध घेतला, मात्र यश आले नाही.

बुधवारी मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांच्या मदतीने तो बाहेर काढण्यात आला. देवरे यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news