Satara Extortion Case: कॉन्‍ट्रॅक्‍टसह खंडणी मागणार्‍या ५ जणांना अटक; संशयित पुणे, सांगली जिल्‍ह्यातील

तीन दिवस पोलिस कोठडी
Extortion Case
Extortion CasePudhari
Published on
Updated on

शिरवळ : नायगाव (ता. खंडाळा) येथील महाफंट इंडिया (शेरा) या कंपनीत कॉन्ट्रॅक्‍ट मिळावे. याचबरोबर दरमहा पाच लाखांची खंडणी मागितल्‍याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी पाच जणांना अटक केली. या संशयितांनी कंपनीच्‍या चालकाला दमदाटी करत जीवे मारण्‍याची धमकी दिल्‍याचाही आरोप तक्रारीत करण्‍यात आला आहे.

याप्रकरणी विशाल नंदकुमार पवार (रा कानरवाडी, ता. कडेगाव, जि. सांगली), अभिजित गणपत साठे (रा. मोकरवाडी, नऱ्हेगाव, ता. हवेली, जि. पुणे), अक्षय रवींद्र डबाणे (रा. तडसर, ता. कडेगाव, जि. सांगली), विजय बंडू गलांडे (रा. पेठ, ता. तासगाव, जि. सांगली), संकेत ज्ञानेश्वर येवले (रा. पसरणी, ता. वाई, जि. सातारा) अशी अटक केलेल्‍या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन-चार महिन्यांपासून संबंधित युवकांकडून सातारा येथील एस. एम. एंटरप्राइजेसलाच कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट मिळावा, यासाठी दबाव आणला जात होता. तसेच दरमहा पाच लाख रुपये कमिशन देण्याची मागणी केली जात होती. गुरुवारी दुपारी काही युवकांनी कंपनीचा मालवाहतूक करणारा ट्रक अडवून चालकाला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवले. कंपनीतून माल बाहेर का काढला आणि पाच लाखांचे कमिशन का दिले नाही, अशी दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली.

कंपनीचे एचआर अधिकारी महेश कोरटकर यांच्या फिर्यादीवरून शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्‍या आधारे तपास करत संशयितांना जेरबंद केले. यानंतर पाचही संशयितांना खंडाळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ तपास करीत आहेत.

या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. नायगाव-सांगवी परिसरातील कंपन्यांना कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली धमकावण्याच्या घटना रोखून औद्योगिक वातावरण सुरक्षित करावे.
- स्‍वाती जमदाडे, सरपंच, नायगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news