सातारा : फटाके स्फोटके नष्ट करणार्‍याला कोठडी

संशयित मृताचा चुलत भाऊ; तपासाचा फास आवळला
Firecracker explosion
कोठडीPudhari File Photo
Published on
Updated on

सातारा : सातार्‍यातील फटाके बनवणार्‍या दारूच्या भीषण स्फोट प्रकरणात तबरेज गणी पालकर (वय 42, रा. गुरुवार परज, सातारा) या दुसर्‍या संशयिताला पोलिसांनी अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याला दि. 6 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. बेकायदा फटका बनवणार्‍या टोळीमध्ये त्याचाही सहभाग असून, माची पेठेतील स्फोटानंतर त्याने फटाक्यासाठी आणलेल्या आणखी स्फोटकांसह इतर वस्तू नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तो मृत मुजमीन याचा चुलत भाऊ असून सातारा शहर पोलिसांनी तपासाचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे.

बुधवारी सातार्‍यातील गजबजलेल्या माची पेठेतील चिकन सेंटरमध्ये फटाके बनवणार्‍या दारुच्या स्फोटकांचा भीषण स्फोट होवून मुजमीन पालकर याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत मुजमीन याचा सख्खा भाऊ शहीद पालकर याला सुरुवातीला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीमध्ये बेकायदा स्फोटके आणून फटाके बनवणार्‍यांमध्ये त्याचा चुुलत भाऊ तबरेज याचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी त्याचा शोध घेत अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीमध्ये त्याने फटाके बनवण्यासाठी आणलेल्या दोन पोती स्फोटकाची विल्हेवाट लावल्याचा प्रयत्न केल्याची कबुली पोलिसांना दिली.

पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तबरेज याला फटाक्याची स्फोटके नष्ट करण्याचे ठिकाण विचारले असता जुना मोटर स्टॅन्ड येथील मोठ्या गटारीत साहित्य टाकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून स्फोटके तसेच आपटी बार बनवण्यासाठी लागणारे कागद, खडी हे नाल्यात पडले असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यानुसार साहित्य जप्त केले आहे. फटाक्यांमध्ये आपटीबार बनवण्याचा उद्योग हे तिघेजण करत होते. हे सर्व बेकायदेशीर असून संशयित दोघांकडे चौकशी सुरु असल्याने यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचाही पोलिस तपास करत आहेत.

दरम्यान, सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोनि राजेंद्र मस्के, पोलिस श्री देशमुख, राहूल घाडगे तसेच डीबीच्या पथकाने शुक्रवारी तबरेज पालकर याला न्यायालयात हजर केले. बचाव व सरकार पक्षाने केलेल्या युक्तिवादानंतर तबरेज याला रविवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुरवठादाराचे नाव उघड होणार?

सातार्‍यात झालेल्या स्फोटकाने संपूर्ण शहर हादरले आहे. मुजमीन याचे शरीर छिन्नविच्छिन्न होऊन परिसरातील घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. यामुळे स्फोटकांचे प्रमाण प्राथमिक माहितीनुसार, 60 किलो आहे. हा साठा कुठून व कोणी आणला? हा तपासाचा महत्त्वाचा भाग आहे. सातारा शहर पोलिसांनी त्यावर लक्ष केंद्रित केले असून, संबंधिताचे नाव कधी ओपन होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news