Satara Crime : मुलीवरील अत्याचारप्रकरणी नराधम बापाला सक्तमजुरी

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
Satara Crime News
मुलीवरील अत्याचारप्रकरणी नराधम बापाला सक्तमजुरीFile Photo
Published on
Updated on

वडूज : स्‍वत:च्‍या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी नराधम बापाला वडूज न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विद्याधर काकतकर यांनी दिला.

१९ ऑगस्ट २०२४ रोजी शिंगणापूर ते मार्डी रस्त्यालगत नराधम बापाने स्‍वत:च्‍या मुलीवर अत्‍याचार केले. पीडितेने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान १४ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे तसेच साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता अजित साबळे आणि वैभव काटकर यांनी काम पाहिले. न्यायालयाने पोक्‍सोअंतर्गत नराधम बापाला १० वर्ष सक्‍तमजुरी व ३५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. महिला हवालदार विजयालक्ष्मी दडस, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, पोलीस हवालदार चेतन सानप, सागर सजगणे व अमीर शिकलगार यांनी खटल्‍यासाठी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news