Satara Theft: शेतीपंपांच्या केबल चोरीचा पर्दाफाश; तांबे विक्रीसाठी आलेले दोघे जाळ्यात

पसरणी रोडवर सापळा रचून पोलिसांची कारवाई
Satara Theft: शेतीपंपांच्या केबल चोरीचा पर्दाफाश; तांबे विक्रीसाठी आलेले दोघे जाळ्यात
Published on
Updated on

वाई : शेतीपंपांच्या मोटारींच्या केबल चोरीचे प्रकार वाढत असतानाच वाई पोलिसांनी कारवाई करत चोरीची कॉपर केबल जाळून त्यातील तांबे विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. पसरणी रोडवर सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली.

समीर सुरेश तुपे (२०) व राहुल दादाराव पांचांगे (२४), दोघेही रा. गुरेबाजार झोपडपट्टी, सिद्धनाथवाडी, वाई, अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

तारांगण सहकारी गृहनिर्माण सोसायटी, सिद्धनाथवाडी, वाई येथील पार्किंगमधून कॉपर केबल चोरीला गेली होती. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केबल चोरीचा तपास सुरू असताना दोन इसम तांब्याची तार विक्रीसाठी पसरणी रोडवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना तांब्याच्या तारेसह पकडले.

पोलिस चौकशीत दोघांनी चोरीची कबुली दिली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, नितीन कदम, विक्रम धोत्रे, हेमंत शिंदे, विशाल शिंदे, मारोती लोलापोड व उमेश लोखंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news