Satara Gold Fraud: बनावट हॉलमार्कच्या बांगड्या तारण ठेवून केली फसवणूक

इमार्क्स फायनान्स कंपनीची १० लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक
Gold Fraud
Gold Fraud
Published on
Updated on

सातारा : बनावट हॉलमार्क आणि कॅरेटचा शिक्का असलेल्या बांगड्या खऱ्या सोन्याच्या असल्याचा बनाव करून त्या तारण ठेवत इमार्क्स फायनान्स कंपनीची १० लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २५ मार्च रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजल्यापासून ते दि. २६ जून या कालावधीत पंताचा गोट येथील इमार्क्स फायनान्स कंपनीच्या शाखेत हा प्रकार घडला. संशयितांनी बनावट सोन्याच्या बांगड्यांवर हॉलमार्क व कॅरेट दर्शवणारे शिक्के मारून त्या अस्सल सोन्याच्या असल्याचे भासवत कंपनीकडे तारण ठेवल्या. त्याआधारे त्यांनी कंपनीकडून एकूण १० लाख ३५ हजार रुपयांचे कर्ज घेत विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी इमार्क्स फायनान्स कंपनीचे कर्मचारी श्रीकांत दिलीपराव भोईटे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून सोमनाथ भुजंगराव बाबर (रा. साबळेवाडी, ता. सातारा) आणि उमेश शशिकांत शिंदे (मूळ रा. कोरेगाव, जि. सातारा, सध्या रा. चिंतामणी सोसायटी, पोतदार मिलजवळ, मुंबई) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार माने करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news