Satara Bogus Doctor : पिंपोडे बुद्रुक येथे बोगस डॉक्टरांवर गुन्हा

पिंपोडे बुद्रुक ( ता. कोरेगाव) येथे अधिकृत वैद्यकीय परवाना किंवा पात्रता नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्‍टरांवर कोरेगाव तालुका आरोग्‍य विभागाने छापा टाकला
Bogus Doctor
bogus doctorspudhari photo
Published on: 
Updated on: 

​पिंपोडे बुद्रुक : पिंपोडे बुद्रुक ( ता. कोरेगाव) येथे अधिकृत वैद्यकीय परवाना किंवा पात्रता नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्‍टरांवर कोरेगाव तालुका आरोग्‍य विभागाने छापा टाकला. यामध्‍ये दोन बोगस डॉक्‍टरांवर गुन्‍हा दाखल झाला. शिवपद सतीश मंडल आणि दत्तात्रय वामन पिंपोडकर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित बोगस डॉक्टरांची नावे आहेत.

याबाबत वाठार स्टेशन पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : मंडल आणि पिंपोडकर हे दोघेही अनेक दिवसांपासून पिंपोडे बुद्रुक येथे कोणत्याही वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत परवानगीशिवाय विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय चालवत होते. २०१६ मध्येही यांच्या याच बोगसगिरीविरोधात वाठार पोलिसांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही संशयितांना न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत वैद्यकीय व्यवसाय करण्यास सक्त मनाई असल्याची नोटीस दिली होती.

मात्र, शिवपद मंडल हा खुलेआम पुन्हा वैद्यकीय व्यवसाय करत होता. कायदा सुव्यवस्थेला न जुमानता मंडल हा आपला बोगस वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची तक्रार आरोग्य विभागाला प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत कोरेगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समीर टकले यांनी पाहणी करत ३ नोव्हेंबर रोजी या दोघांनाही वैद्यकीय व्यवसाय करताना रंगेहाथ पकडले.

​आरोग्य अधिकाऱ्यांच्या या कारवाईनंतर दोघांच्याही अवैध व्यवसायाचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी डॉ. समीर टकले यांच्या फिर्यादीनुसार दोन्ही संशयितांवर विनापरवाना व अनधिकृतपणे व्यवसाय करत लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ग्रामीण भागात अवैध आणि बोगस वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.