Satara Crime : कोयत्‍याने वार करत पैशांची मागणी

महिलेशी बोलत असल्‍याचा राग; पाच जणांवर गुन्‍हा
 Koyta Attack
Koyta Attack Pudhari
Published on: 
Updated on: 

सातारा : एका महिलेशी बोलत असल्‍याच्‍या रागातून पाच जणांनी दोघांवर कोयत्‍यासारख्या शस्‍त्राने हल्‍ला चढवत मारहाण केली. छेडछाड करतो, असा गुन्‍हा दाखल करायचा नसेल, तर एक लाख रुपये दे, असे म्‍हणत पैसे मागितल्‍याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल झाला. शुभम साठे, अनिकेत माने यांच्यासह अनोळखी १० ते १२ जणांविरुद्ध स्‍वप्निल शिंदे (सध्या रा. राधिका चौक, सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ही घटना दि. २२ नोव्‍हेंबर रोजी वेणेखोल ते सातारा रस्‍त्‍यावरील जनाई देवी मंदिराच्या परिसरात घडली. स्‍वप्‍निल शिंदे व त्‍यांचा मित्र दुचाकीवरून निघाले होते. त्‍यावेळी संशयितांनी रस्‍ता अडवला. संशयित टोळक्‍याने एका महिलेची छेड का काढतो, असे विचारत तसा गुन्‍हा दाखल करण्याची धमकी दिली. हा वाद सुरू झाल्‍यानंतर संशयितांनी गुन्‍हा दाखल करायचा नसेल, तर १ लाख रुपये दे, अशी मागणी केली.

हा वाद टोकाला गेल्‍यानंतर संशयितांनी स्‍वप्‍निल व यांच्या मित्राला लाकडी दांडक्‍याने मारहाण करण्यास सुरुवात केली. संशयित टोळक्‍याने हल्‍ला केल्‍यानंतर त्‍यातील एकाने कोयत्‍याने वार केले. हल्‍ल्‍यानंतर हल्‍लेखोर तेथून पसार झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्‍थळी व रुग्णालयात धाव घेतली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध खुनाच्या प्रयत्‍नासह इतर कलमांअतर्गत गुन्‍हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.