Satara Suspicious Death : मित्राला भेटायला गेलेल्या वृद्धाचा संशयास्पद मृत्यू

मित्राला वडापाव आणण्यासाठी सांगितले त्यानंतर संशयास्पदरित्या वृद्ध कांता शंकर सुतार हे रक्‍ताच्या थारोळ्यात
Death
Death
Published on: 
Updated on: 

दहिवडी : दहिवडी येथे मित्राला भेटायला गेलेल्या एका वृद्धाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. वडापाव खाण्याची इच्छा झाल्याने मित्राला वडापाव आणण्यासाठी सांगितले. त्यानंतर संशयास्पदरित्या वृद्ध कांता शंकर सुतार हे रक्‍ताच्या थारोळ्यात आढळू्न आलेे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कांता सुतार हे गणेश प्रतापराव पंडित यांच्या घरी सहज भेटीसाठी आले होते. कांता सुतार यांनी खाण्यासाठी वडापाव मागितला. त्यानुसार गणेश पंडित हे वडापाव आणण्यासाठी घराबाहेर गेले होते. काही मिनिटांनी ते घरी परतले असता सुतार हे खुर्चीजवळ रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेले आढळले. परिसरात सुरू असलेल्या चर्चेनुसार, सुतार हे अचानक खुर्चीवरून पडले असावेत. यावेळी खुर्चीचा एखादा तुकडा त्यांच्या गळ्यात अडकल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी रणजीत सावंत यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी येऊन पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.