DJ News : ‘डीजे’चे गुन्‍हे पोकळ; आवाजाची कायद्यात हुर्रे

‘एफआयआर’ची तरतूदच नाही : लालफितीचा अजब कारभार
DJ News
DJ News
Published on
Updated on
विठ्ठल हेंद्रे

सातारा : यंदा डीजे विरोधात राज्यभरात रान उठले असताना अनेक मतप्रवाह समोर आले आहेत. मुळात डीजे वाजत असेल तर थेट 'एफआयआर' दाखल करण्याची तरतूदच कायद्यात नाही. लालफितीच्या अजब कारभारात डीजेवरील कारवाईचा वर्षानुवर्ष फास अडकला आहे. दरम्‍यान, सातार्‍यात गेल्‍या दीड महिन्‍यात 'डीजे'बाबत पोकळ गुन्‍हे दाखल झाले असून आवाजाची हुर्रे झाली असल्‍याचे वास्‍तव आहे.

डीजे, ध्वनिक्षेपक हा वाजवायचा असल्‍यास त्‍याबाबतची परवानगी स्‍थानिक पोलिसांकडून घ्यावी लागते. पोलिस सर्वोच्च न्‍यायालयाच्या सूचना सांगून परवानगी देते. वेळेची मर्यादा देखील सांगतात. मात्र नेमकी मेख पुढे आहे. तांत्रिक परवाना मिळाला की, वाजवणारा आवाजाची मर्यादा पाळत नाही. यामुळे संपूर्ण समाज वेठीस धरला जातो. कानावर, हृदयावर डीजेचे गंभीर परिणाम होतात. वास्‍तविक डीजे वाजत असताना पोलिसांना ती साउंड सिस्‍टीम बंद करण्याचा व जप्‍त करण्याचा अधिकार आहे. मात्र अशावेळी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली तर कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्‍यता ग्रहीत धरली जाते. यामुळे पोलिस ऑन द स्‍पॉट डीजे बंद करत नाहीत व जप्‍त करत नाहीत.

कोर्टात थेट असे जाते प्रकरण..

डीजेचा दणदणाट होत असेल पोलिस डेसीबलचे मशीन, साक्षीदार, पंचासह घटनास्‍थळी जातात. डीजेच्या आवाजाचे नमुने पंचासमोर घेतले जातात. त्‍यानंतर त्‍याचे रेकॉर्ड तयार करुन डीवायएसपी यांना पाठवतात. डीवायएसपी त्‍या प्रस्‍तावाचे अवलोकन करुन ९० दिवसांत चार्जशीट तयार करून कोर्टात ते प्रकरण दाखल करतात. कोर्टात वर्षानुवर्ष ही केस चालते.

तात्‍पुरत्‍या मलमपट्टीचे गुन्‍हे

गेल्‍या दीड महिन्‍यात एकट्या सातार्‍यात डीजेबाबत पोलिसांनी सुमारे १५ गुन्‍हे दाखल केले आहेत. हे गुन्‍हे दाखल करताना पोलिसांनी कोणताही डीजे जप्‍त केला नाही. आवाज मर्यादेच्या नोंदी घेतली आहे. गुन्‍हे दाखल करताना त्‍यामध्ये वाहतुकीस अडथळा. मोठ्या आवाजात डीजे लावला होता. मंडळांना पुढे जाण्याची विनंती केली असतानाही पोलिसांचे त्‍यांनी ऐकले नाही, अशा एफआयआर पोलिसांनी दाखल केल्‍या आहेत.

सक्षम तपास करा, शिक्षा बसवा...

डीजे बंदीसाठी पोलिसांनी आवाजाच्या नोंदी घेऊन चांगल्‍या प्रकारचे चार्जशीट तयार करावा. या चार्जशीटमधील साक्षी, पुरावे या आधारावर डीजे चालकांना शिक्षा लागल्‍यास भविष्यात चांगला प्रतिबंध येण्यास मदत मिळेल. दुर्दैवाने मात्र तसे होत नाही. डीजे चालकांना शिक्षा लागल्‍याचे गेल्‍या १० वर्षात ऐकण्यात नाही. १५ ते २० वर्षात एखाद-दुसरी याप्रकरणी शिक्षा लागली असल्‍याचे वास्‍तव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news