Satara news: जिल्हा क्रीडाधिकारी तारळकर निलंबित

सोलापूर व सातारा येथील जलतरण तलावातील केलेल्या भ्रष्टाचाराचा ठपका ठेवत सातारा जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांना निलंबित केले
Satara news: जिल्हा क्रीडाधिकारी तारळकर निलंबित
File Photo
Published on
Updated on

सातारा : सोलापूर व सातारा येथील जलतरण तलावातील केलेल्या भ्रष्टाचाराचा ठपका ठेवत सातारा जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांना निलंबित केले आहे. याबाबत महाराष्ट्र क्रीडा व युवक सेना सहसंचालक सुधीर मोरे यांनी आदेश काढले आहेत. आदेश काढलेल्या दिवसापासून तारळकर हे रजेवर गेले आहेत. सोलापूर व सातारा दोन्ही कार्यालयांतील भ्रष्टाचाराबाबत चौकशी लागल्याने तारळकर यांचा पाय खोलात गेला आहे.

तारळकर यांच्या विरुद्ध संचालनालयामार्फत 2 प्रकरणांच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी केली होती. तारळकर हे सोलापूर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असताना झालेल्या प्राथमिक चौकशी अहवालाच्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू केली आहे. यामुळे शासनाने त्यांना निलंबित केले आहे.

तसेच, सातारा येथील आलेल्या तक्रार अर्जान्वये चौकशी करून याबाबतचा अहवाल विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर यांनी क्रीडा संचालनालयास सादर केला आहे. या चौकशी अहवालावर तारळकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यावर त्यांचा खुलासा घेतला आहे. त्यानंतर त्यांची विभागीय चौकशी सुरू असून, शासनामार्फत पुढील कार्यवाही सुरू आहे. सातारा व सोलापूर कार्यालयांत काही भ्रष्टाचाराच्या फाईल्स या क्रीडा व युवक सेना सहसंचालकांकडे अजून पेंडिंग आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news