

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रशासकीय पातळीवर कामकाज गतीने होऊ लागले आहे. सातारा जिल्हा परिषदेसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे, तर हरकतींसाठी अवघे तीन दिवस राहिले आहे. जिल्हा परिषदेच्या 65 गट व 130 गणांसाठी सुमारे 21 लाख 91 हजार 374 मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, दि. 27 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
प्रारूप मतदार यादीनुसार खंडाळा तालुक्यातील शिरवळ गटात 32 हजार 33, भादे 32 हजार 733, खेड बु.33 हजार 516 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. फलटण तालुक्यातील तरडगाव गटासाठी 30 हजार 251, साखरवाडी पिंपळवाडी 32 हजार 84, विडणी 30 हजार 290, गुणवरे 32 हजार 105, बरड 33 हजार 14, कोळकी 33 हजार 158, वाठार निंबाळकर 32 हजार 55, हिंगणगाव 30 हजार 270 मतदार आहेत. माण तालुक्यातील आंधळी गटात 34 हजार 816, बिदाल 32 हजार 624, मार्डी 32 हजार 717, गोंदवले बु. 37 हजार 3, कुकुडवाड गटात 38 हजार 291 मतदार मतदान करणार आहेत.
खटाव तालुक्यातील बुध गटात 36 हजार 288, खटाव 34 हजार 777, कातरखटाव 36 हजार 653, निमसोड 33 हजार 888, औंध 31 हजार 859, पुसेसावळी 34 हजार 85, मायणी 32 हजार 619 मतदार आहेत. कोरेगाव तालुक्यात पिंपोडे बु. 33 हजार 557, वाठारस्टेशन 31 हजार 510, सातारारोड 33 हजार 814, कुमठे 34 हजार 329, एकंबे 34 हजार 206, वाठार किरोलीत 31 हजार 529 मतदार आहेत. वाई तालुक्यातील यशवंतनगर गटात 34 हजार 990, बावधन 36 हजार 732, ओझर्डे 34 हजार 692, भुईंज 33 हजार 22 मतदार आहेत. महाबळेश्वर तालुक्यात तळदेव गटात 17 हजार 525 तर भिलार गटात 18 हजार 732 मतदार आहेत.
जावली तालुक्यात म्हसवे गटात 29 हजार 38, कुडाळ 33 हजार 81, कुसूंबी गटात 29 हजार 878 मतदार आहेत. सातारा तालुक्यात पाटखळ गटात 36 हजार 831, लिंब 40 हजार 699, खेड 32 हजार 55, कोडोली 31 हजार 548, कारी 33 हजार 895, शेंद्रे 32 हजार 742, वर्णे 41 हजार 100, नागठाणे 31 हजार 680 मतदार आहेत. पाटण तालुक्यात गोकूळ तर्फ हेळवाक गटात 34 हजार 697, तारळे 34 हजार 650, म्हावशी 36 हजार 830, मल्हारपेठ 39 हजार 441, मारूल हवेली 38 हजार 955, मंद्रुळ कोळे 43 हजार 214, काळगाव 42 हजार 667 मतदार आहेत. कराड तालुक्यात पाल गटात 34 हजार 231, उंब्रज 35 हजार 107, मसूर 36 हजार 39, कोपर्डे हवेली 30 हजार 284, सैदापूर 32 हजार 902, वारूंजी 32 हजार 25, तांबवे 29 हजार 857, विंग 30 हजार 667, कार्वे 35 हजार 164, रेठरे बु. 35 हजार 764, काले 38 हजार 485, येळगाव 36 हजार 81 मतदार आहेत. असे सर्व गटात 21 लाख 91 हजार 374 मतदार आहेत. यामध्ये 10 लाख 79 हजार 460 महिला व 11 लाख 11 हजार 854 पुरुष मतदार आहेत.
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य शासनाकडील आदेशाने जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक विभाग गणनिहाय दि. 8 ऑक्टोबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. दि. 14 ऑक्टोबर प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी आहे. दि. 27 ऑक्टोबर रोजी मतदार याद्या अंतिम होणार आहेत.