सातारा जिल्हा बँक : अध्यक्षपदी नितीन काका पाटील, उपाध्यक्षपदी अनिल देसाईंची बिनविरोध निवड

सातारा जिल्हा बँक : अध्यक्षपदी नितीन काका पाटील, उपाध्यक्षपदी अनिल देसाईंची बिनविरोध निवड

सातारा ; पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आज (सोमवार) सकाळी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडी पार पडल्या. खा. शरद पवार यांनी दिलेल्या निर्णयानुसार, अध्यक्षपदी नितीन काका पाटील यांची तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची निवड झाली.

सातारा जिल्हा बँकेसाठी सोमवारी बँकेच्या सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या निवडी बिनविरोध पार पडल्या. अध्यक्षपदासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि नितीन काका पाटील यांची नावे चर्चेत होती. या मध्ये शरद पवार यांनी नितीन काका पाटील यांचे नाव निश्चित केले. त्यामुळे त्यांना संधी मिळाली आहे.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news