Satara District Bank : जिल्हा बँकेच्या आखाड्यात खंडाळ्यातून १३ अर्ज

महायुतीच्या जागावाटपाकडे लक्ष : सोसायटीत चुरशीची लढत
Satara District Bank
Satara District Bank
Published on: 
Updated on: 
शशिकांत जाधव

लोणंद : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने खंडाळा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध मतदारसंघांतून राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांनी तब्बल १३ उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता महायुतीच्या जागावाटपाच्या निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून तालुक्‍यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सातारा जिल्ह्यातील २१ संचालक पदांसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे छाननीनंतर कोणते अर्ज कायम राहतात आणि माघारीच्या टप्प्यात कोण कोणाच्या बाजूने माघार घेतो, यावर पुढील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जि. प. सदस्य संतोष साळुंखे, खंडाळा कारखान्याचे संचालक व ज्येष्ठ नेते ॲड. शामराव गाढवे, लोणंद बाजार समितीचे संचालक राजेंद्र नेवसे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर भाजपकडून माजी जि.प. उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, माजी सभापती आनंदराव शेळके-पाटील, तसेच भाजपचे जिल्हा सरचिटणीस संजीव उर्फ अनिरुद्ध गाढवे यांनी अर्ज दाखल केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने संतोष साळुंखे यांना संधी देण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर भाजपाकडून तिघांपैकी कुणाला संधी मिळणार, हे पाहणे औत्‍सुक्‍याचे आहे. राखीव मतदारसंघातही खंडाळ्याची दावेदारी केली आहे त्यामध्ये नागरी बँका व सहकारी पतसंस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून मराठा नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिलराजे निंबाळकर यांनी अर्ज दाखल केला आहे. महिला राखीव मतदारसंघातून भाजपकडून माजी सभापती दीपाली साळुंखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

विमुक्त जाती व भटक्या जमाती मतदारसंघातून आनंदराव शेळके-पाटील, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब धायगुडे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर राष्ट्रवादीकडून माजी उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. ओबीसी मतदारसंघातून भाजपकडून म्हावशीचे दिनकर राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news