Satara News : जिल्ह्यातील धरणात ८९.६८ टक्के पाणी

पावसाने ओढ दिली असल्याने धरणातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होऊ लागली आहे
Satara News : जिल्ह्यातील धरणात ८९.६८ टक्के पाणी
Published on: 
Updated on: 

सातारा : सातारा जिल्ह्यातील धरणात सद्यस्थितीत ८९.६८ टक्के पाणीसाठा आहे. मात्र पावसाने ओढ दिली असल्याने धरणातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होऊ लागली आहे. धरणातील पाणीसाठ्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी शेतीसाठी पाण्याची टंचाई भासणार आहे.

जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी जास्त राहिले असले तरी प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुर्त गंभीर होण्याची शक्यता कमी झाली आहे. पावसाने पुर्णत: उघडीप दिली आहे. जिल्ह्यातील दिवसेंदिवस कडक ऊन पडत असल्याने पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. मात्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. शेतीसाठी सिंचनाचे आवर्तन, गावांच्या पाणीपुरवठा योजना तसेच औद्योगिक आणि अन्य वापरासाठी पाण्याचे नियोजन करताना धरणातील पाणीसाठ्याचा विचार केला जाणार आहे.

कोयना धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा ९१.३२० टीएमसी असून धरणात ९१.२१ टक्के पाणी आहे. धरणाच्या विद्युत गृहातून १ हजार ५० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. धाेम धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा १०.९४० टीएमसी असून धरणात ९३.५८ टक्के पाणी आहे. धोम बलकवडी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा ३.४३० टीएमसी असून धरणात ८६.६२ टक्के पाणी आहे. कण्हेर धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा ८.६४० टीएमसी असून धरणात ९०.०९ टक्के पाणी आहे. उरमोडी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा ८.४९० टीएमसी असून धरणात ८७.९८ टक्के पाणी आहे. तारळी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा ५.३२० टीएमसी असून धरणात ९१.१० टक्के पाणी आहे.

मध्यम प्रकल्प असलेल्या येरळवाडी धरणात २५.१७ टक्के, नेर ७२.१२ टक्के, राणंद ०.८८ टक्के, आंधळी १३.३६ टक्के, नागेवाडी १०० टक्के, मोरणा ९९.६९ टक्के, उत्तरमांड ६६.८६ टक्के, महू ७९.६३ टक्के, हातगेघर ४४.८० टक्के, वांग मराठवाडी धरणात ६६.९५ टक्के पाणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news