Satara Fire Incident : दहिवडीत फर्निचरच्या गोडावूनला भीषण आग

आगीत गोडावूनमधील फर्निचर व कार्यालयीन साहित्य जळून सात लाख रुपयांचे नुकसान
Fire
FirePudhari
Published on: 
Updated on: 

दहिवडी : दहिवडी येथील बाजार समितीच्या आवारातील फर्निचरच्या गोडावूनला गुरुवारी सकाळी भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. या आगीत गोडावूनमधील फर्निचर व कार्यालयीन साहित्य जळून सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास बाजार समितीच्या आवारातील फर्निचरच्या गोडावूनमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले. ही बाब निदर्शनास येताच गोडावून मालक लालसरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वडूज व म्हसवड येथील अग्निशामक दलाला पाचारण केले. दोन्ही ठिकाणच्या अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्‍यात आणण्‍यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.