Satara Crime: सायबर फसवणुकीचे पैसे बँक खात्‍यात घेणार्‍यावर गुन्‍हा

९० लाखांची रक्कम स्‍वत:च्‍या बँक खात्‍यात घेतली
Cyber fraud
Cyber fraud File Photo.
Published on
Updated on

सातारा : देशाच्‍या विविध भागातील पाच जणांची सायबर फसवणूक करत त्‍यांची ९० लाखांची रक्कम स्‍वत:च्‍या बँक खात्‍यात घेतल्‍याप्रकरणी खिंडवाडी, ता. सातारा येथील एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल आहे. ज्ञानेश्‍वर प्रकाश जाधव (वय ३८, रा. खिडवाडी) असे संशयिताचे नाव आहे.

याची तक्रार सायबर पोलिस ठाण्‍यातील हवालदार अतुल तावरे यांनी दिली आहे. खिंडवाडी येथील ज्ञानेश्‍वर जाधव याने किसान क्रॉप फर्टीलायझर या नावाने सातार्‍यातील एका बँकेत २०२४ मध्‍ये खाते उघडले. या खात्‍यात देशाच्‍या विविध भागातून मोठ्या रक्कमा येत असत. याबाबतची तपासणी त्‍या बँकेच्‍यावतीने करण्‍यात आली. तपासणीत ज्ञानेश्‍वर जाधवच्‍या खात्‍यात २०२४ ते २०२६ या काळात देशातील विविध बँक खात्‍यातून ८९ लाख ९४ हजार ७१० रुपये आल्‍याचे आढळले.

याबाबतचा अहवाल नंतर बँकेच्‍यावतीने सायबर पोलिस ठाण्‍यास देण्‍यात आला. पडताळणीनंतर ज्ञानेश्‍वर जाधवच्‍या खात्‍यात येणारी रक्कम सायबर फसवणुकीतील असल्‍याचे समोर आले. त्‍यानंतर हा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news