Nagewadi Murder Case : नागेवाडीत वहिनीचा खून

जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने वार : संशयित ताब्यात
Family Dispute Murder
Family Dispute MurderPudhari
Published on
Updated on

वाई : नागेवाडी (ता. वाई) येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या दिराने वहिनीचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित दिराला वाई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गीताबाई चंद्रकांत यादव (वय 45, रा. नागेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांचे पती चंद्रकांत विठ्ठल यादव (50) यांनी वाई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भिकू विठ्ठल यादव (55) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

वडिलोपार्जित शेतीजमिनीच्या विक्रीवरून कुटुंबात काही दिवसांपासून वाद सुरू होता. संशयित भिकू यादव हा जमीन विकण्यासाठी दबाव टाकत होता; मात्र चंद्रकांत व गीताबाई यांचा याला विरोध असल्याने तो चिडून होता. मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास भिकू यादव हा घरात आला. त्यावेळी चंद्रकांत हे शेतीकामासाठी बाहेर पडत असताना त्यांना गीताबाई यांच्या आरडाओरडाचा आवाज आला. यामुळे चंंद्रकांत यांच्यासह शेजाऱ्यांनी घरात धाव घेतली. यावेळी गीताबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. प्रत्यक्षदर्शींनी संशयित भिकू यादव याने गीताबाई यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत असल्याचे पाहिले. शेजाऱ्यांना पाहताच भिकू यादव हा पसार झाला.

हल्ल्यात गीताबाई या गंभीर जखमी झाल्या आणि यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर घटनेची माहिती पोलिस पाटील दीपक बनसोडे यांना दिली. याप्रकरणी वाई पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितास ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news