Satara Crime: तरुणीवरील अत्याचारप्रकरणी खडकी येथील दोघांना अटक

लग्नाचे आमिष दाखवून तसेच जेजुरी येथे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी
Crime
Crimepudhari photo
Published on
Updated on

म्हसवड : लग्नाचे आमिष दाखवून तसेच जेजुरी येथे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी म्हसवड पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ जून ते १३ जुलै २०२६ या कालावधीत माण तालुक्यातील एका गावातील पीडितेच्या राहत्या घरी तसेच पुणे-जेजुरी मार्गावरील एका कारमध्ये ही घटना घडल्याचा आरोप आहे. मुख्य संशयित नागेश महादेव खांडेकर (रा. खडकी, ता. माण, जि. सातारा) याने लग्नाचे आमिष दाखवून तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर अत्याचार केल्याची तक्रार आहे. या कृत्यात योगेश करचे याने मदत केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास पीडितेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news