Satara Crime: ’त्या’ कारसह मारेकर्‍याचा शोध सुरूच

पत्नीसह मेहुण्याला पोलीस कोठडी; पोलिसांच्या हाती महत्त्वपूर्ण माहिती
Crime News
Crime NewsPudhari Photo
Published on
Updated on

कराड : जलसंपदा विभागाचे अभियंता लक्ष्मण श्रीरंग मंडले यांची हत्येप्रकरणी वापरलेल्या कारसह मारेकर्‍यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. कारवर कोणताही नंबर प्लेट नसल्याने आणि संशयित सुरेखा मंडलेकडून ठोस माहिती मिळत नसल्याचे विलंब लागत असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. मारेकर्‍यांच्या शोधासाठी सातारा, सांगलीसह मुंबईकडे पोलीस पथके रवाना झाली असून सराईत संशयित पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

संशयित सुरेखा मंडलेसह तिचा भाऊ संग्राम दिनकर चव्हाण (रा. सुरूल, ता. वाळवा) या संशयितांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी १२ जूनपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलीस चौकशीवेळी सुरेखा मंडलेकडून मारेकर्‍यांबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. तर संग्राम चव्हाण यापासून हात झटकत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच लक्ष्मण मंडले यांना चिरडून मारण्यासाठी वापरलेली कार आणि मारेकार्‍यांबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही, असे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून सांगितले जात आहे.

कराड शहरासह विविध ठिकाणच्या कारची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. हत्येवेळी कारवरील नंबर प्लेट काढून ठेवल्याचे चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे ही कार कोणाच्या मालकीची आहे? याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. एकीकडे अशी परिस्थिती असतानाच मारेकर्‍यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती हाती लागली असून एक ते दोन दिवसात सर्व उलगडा होईल, अशी माहिती पोलिसांकडून दिली जात आहे.

गावच्या घराचे स्वप्न अधुरेच...

लक्ष्मण मंडले यांची मागील वर्षी कराडमधून बदली झाली. गावात घर व शेती असून काही महिन्यांपासून नवीन घराचे बांधकाम सुरू आहे.ते अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळेच मंडले यांचे गावातील घराचे स्वप्न अपूर्णच राहिल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news