Satara Crime : म्हसवडमध्ये वाळूची तपासणी केल्याने पोलिसाला नेले फरपटत

वाळूची विनापरवाना वाहतूक करणारा टेम्पो अडवून तपासणी करत असताना पोलिस कर्मचाऱ्याला वाहनाच्या दरवाजाला पकडून फरपटत नेल्याची थरारक घटना म्हसवड परिसरात घडली
Satara Crime : म्हसवडमध्ये वाळूची तपासणी केल्याने पोलिसाला नेले फरपटत
Published on
Updated on

म्हसवड : वाळूची विनापरवाना वाहतूक करणारा टेम्पो अडवून तपासणी करत असताना पोलिस कर्मचाऱ्याला वाहनाच्या दरवाजाला पकडून ४०० ते ५०० मीटर फरपटत नेल्याची थरारक घटना म्हसवड परिसरात घडली. यात पोलिस कर्मचारी महावीर केराप्पा कोकरे किरकोळ जखमी झाले असून, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी प्रीतम नवनाथ लोखंडे (रा. मल्हारनगर, म्हसवड) व अवि अशोक तोरणे (रा. म्हसवड) यांना अटक केली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास मेगासिटी ते बनगरवाडी-विरकरवाडी रस्त्यावर ही घटना घडली. पोलिस कोकरे हे शासकीय मोटारसायकलवरून संशयित वाहनांचा शोध घेत असताना विनानंबरचा टेम्पो संशयास्पदरीत्या जाताना दिसला. त्यांनी तो थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये वाळू भरलेली आढळली. वाळू वाहतुकीचा परवाना आहे का, अशी विचारणा केली असता चालकाने परवाना नसल्याचे सांगितले. चालकाने नाव प्रीतम लोखंडे, तर सोबतच्या व्यक्तीने अवि तोरणे असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

पोलिसाशी चर्चा सुरू असताना तोरणे याने चालकाला टेम्पो घेऊन पळून जाण्यास सांगितले. त्यानंतर चालकाने टेम्पो सुरू करून वेगाने पुढे नेला. यावेळी टेम्पोच्या दरवाजाला पकडून राहिलेल्या कोकरे यांना सुमारे ४०० ते ५०० मीटर फरपटत नेले. त्यामुळे त्यांच्या हाताला, पायाला व गुडघ्याला दुखापत झाली. चालकाने जीवे मारण्याची धमकी देत वाहन रिव्हर्स घेऊन धडक देण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. जखमी कोकरे यांच्यावर म्हसवड येथील हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. पोलिस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news