Satara News : स्‍क्रीनशॉटद्वारे फसवणार्‍या भामट्याला बेड्या २३ लाखाचा मुद्देमाल जप्‍त

सातारा ‘डीबी’ची कारवाई
Satara News
स्‍क्रीनशॉटद्वारे फसवणार्‍या भामट्याला बेड्या २३ लाखाचा मुद्देमाल जप्‍त
Published on
Updated on

सातारा : सातार्‍यात मोबाईल दुकानातून १ लाख ७५ हजार रुपयांचा मोबाईल घेवून त्‍याचे पैसे पाठवल्‍याचा खोटा स्क्रीनशॉट दाखवून फसवणार्‍या भामट्याला शहर पोलिसांच्या ‘डीबी’ पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या. महाराष्ट्रासह गोव्‍यात अशी फसवणूक केली असून पोलिसांनी त्‍याच्याकडून १२ गुन्‍हे उघड करुन २३ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल जप्‍त केला.

आदित्य विनोद गायकवाड (वय २२, रा. कोंढापुरी, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) असे अटक केलेल्‍या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, दि. २७ जून रोजी सातार्‍यातील एसएस मोबाईल शॉप, पोवई नाका येथून एका अनोळखीने मोबाईल फोन खरेदी केला. मोबाईलचे पैसे ऑनलाईन पाठवल्‍याचा बनावट बँक एनईएफटीचा स्‍क्रीनशॉट संशयिताने दुकानदाराला दाखवला. मात्र मोबाईलचे पैसे न जमा झाल्‍याने अखेर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सातारा शहर पोलिसांच्या गुन्‍हे प्रकटीकरण पथकाने (डीबी) घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रीक मदतीने अनोळखी चोरट्याचा तपास सुरु केला. त्‍यानुसार तत्‍काळ संशयिताला कोंढापुरी या गावातून ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलिसांनी गुन्ह्यातील चोरी केलेला मोबाईल फोन जप्‍त केला. पोलिसांनी संशयिताकडे अधिक चौकशी केली असता त्‍याने अनेक जिल्‍ह्यात अशाच पध्दतीने फसवणूक केल्‍याची कबुली दिली.पोनि सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुधीर मोरे, पोलिस निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम, सचिन आदमाने यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news