Satara Fraud : सबसिडीच्या आमिषाने 55 लाखांचा गंडा

‌‘स्टॅन्डअप इंडिया‌’च्या नावाखाली फसवणूक : दोघांवर गुन्हा
Fraud Case
Fraud Casefile photo
Published on
Updated on

सातारा : स्टॅन्डअप इंडिया या योजनेतून 15 टक्के सबसिडी मिळवून नवीन व्यवसाय सुरू करून देतो, असे सांगून रोख रक्कम, चेक व ऑनलाईन पद्धतीने सुमारे 55 लाख 17 हजार 569 रुपये घेऊन एकाची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी साताऱ्यातील तरुणाने दोघांविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संशयित कराड व मुंबई येथील असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

प्रसन्न अरुण भिसे (रा. मंगळवार पेठ, कराड) व अनिकेत हेमंत सुवर्णा (रा. तळोजा, मुंबई) यांच्याविरुद्ध प्रसाद मिलिंद घमरे (वय 30, रा. विलासपूर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना 2022 ते जून 2024 या कालावधीत घडली आहे. घमरे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, भिसे हा दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थेद्वारे नवउद्योजकांसाठी स्डॅन्डअप इंडिया योजनेसाठी समन्वयक म्हणून काम करत होता. त्यातून त्याच्यासोबत ओळख झाली. संशयिताने सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील नवउद्योजकांसाठी स्टॅन्डअप इंडिया सुरू करण्यात आल्याचे सांगितले. तसेच सबसिडी असल्याचे सांगून ते मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

तक्रारदाराने नवीन व्यवसाय सुरू करण्याची तयारी दाखवल्यानंतर संशयिताने डिझेल, पेट्रोल वाहतूक करण्याचा व्यवसाय सुचवला. तक्रारदाराने मान्य केला असता, संशयिताने त्यासाठी लागणारी माहिती दिली. त्यामध्ये ऑईल कंपनीमध्ये टेंडर भरावे लागेल. वाहतुकीसाठी दोन वाहने घ्यावी लागतील, अशी माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news