Satara News : ‘गोल्‍फ कोर्स’ वृक्षतोड, उत्खननप्रकरणी चेअरमन, सचिवावर गुन्‍हा

‘पुढारी’च्‍या दणक्‍यानंतर कारवाईचा दंडुका; महाबळेश्वर पालिकेकडून कारवाई
Satara News
‘गोल्‍फ कोर्स’ वृक्षतोड, उत्खननप्रकरणी चेअरमन, सचिवावर गुन्‍हा
Published on
Updated on

महाबळेश्‍वर : महाबळेश्वर येथील हेरिटेज मिळकत असलेल्‍या गोल्‍फ कोर्स मैदानात बेकायदा वृक्षतोड व उत्‍खनन करण्‍यात आले. याप्रकरणी ‘द क्लब’च्‍या चेअरमन, सचिव आणि मेढा येथील एका ठेकेदावर फौजदारी गुन्‍हा दाखल केला आहे. प्रशासनाच्‍या परवानगीशिवाय हेरिटेज मिळकतीत मनमानी करून ‘द क्‍लब’च्‍या सदस्‍यांनी जी वृक्षतोड व उत्‍खनन या पदाधिकार्‍यांना भोवले आहे. दै. ‘पुढारी’ने यावर आवाज उठवल्‍यानंतर अखेर बड्या लोकांवर कारवाईचा दंडुका उगारण्‍यात आला आहे.

‘द क्‍बल’च्‍या चेअरमन मनीषा गोखले- शहा (वय ६५), सचिव लेफ्ट. कर्नल (निवृत्त) गौतम नंदी (६२, दोघेही रा. महाबळेश्‍वर आणि ठेकेदार सुहास पार्टे (४०, रा. मेढा, ता. जावली) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पालिकेचे वृक्षाधिकारी कल्याण बाजीराव हिवरे (५२) यांनी फिर्याद दिली आहे. महाबळेश्वरच्या या ‘द क्लब’च्या गोल्फ कोर्समधील वृक्षतोडीची सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गंभीर दाखल घेतली होती. अखेर पालिकेकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाबळेश्वर पालिका हद्दीतील गोल्फ कोर्स या वारसास्थळ मिळकतीमध्ये वनराई नष्ट करून मातीचे ढिगारे व उतार तयार करून रस्ते तयार केले. तसेच शेडची उभारणी करून जवळून वाहणारा ओढा वळवला असून पंप यंत्रणा उभारली आहे. पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या विकासकामासाठी देण्यात आलेली मंजुरी व परवानग्यांबाबत सखोल चौकशी करण्याच्या मागणीचा तक्रार अर्ज अनिल पंडित यांनी प्रांताधिकार्‍यांकडे केला होता. त्‍या अनुषंगाने डॉ. योगेश खरमाटे यांनी दि. ११ रोजी पाहणी केली. यामध्‍ये ३० झाडे तोडून विनापरवाना रस्‍ते, तारेचे कुंपन, पत्रा शेड उभारल्‍याचे दिसून आले. याबाबतचा अहवाल डॉ. खरमाटे यांनी जिल्‍हाधिकारी संतोष पाटील यांना पाठवला होता. याबाबत सर्वप्रथम दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिध्‍द करून आवाज उठवला होता.

‘द क्लब’कडून झालेल्या या गंभीर प्रकरणाची जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गंभीर दखल घेत योग्य ती कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले होते. अखेर पालिकेचे वृक्षाधिकारी कल्याण हिवरे यांच्या तक्रारीवरून हा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news