

सातारा : 'दारूचे झालेले बिल काऊंटरवर द्या,' असे म्हटल्याच्या कारणातून चौघांनी सातार्यातील बिअर बारमध्ये धुडगूस घालत राडा केला. गोळ्या घालण्याची धमकी देत मॅनेजरच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
साहील रणदिवे, रोशन यादव, आदित्य वाघमारे, रुद्र अवघडे (सर्व रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) यांच्या विरुद्ध अक्षय गोरखनाथ वाघमळे (वय ३२, सध्या रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना २७ जून रोजी मतकर कॉलनी, येथे घडली. तक्रारदार हे बारमध्ये मॅनेजर म्हणून काम करत आहेत. दारूचे बिल ३,२५० रुपये काऊंटरवर द्या, असे म्हटल्यानंतर संशयितांनी वाद घातला. शिवीगाळ, दमदाटी करत गोळ्या घालण्याची धमकी दिली. इतर संशयितांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत काऊंटरवरील दारूच्या बाटल्या फोडल्या. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला.