Satara Crime: मोहडेकरवाडीत सख्‍ख्‍या भावाचा खून

वडिलांना दारू पिऊन वारंवार त्रास देत असल्याच्या कारणातून कृत्य
Murder
Murder Pudhari
Published on
Updated on

वेळे : वडिलांना दारू पिऊन त्रास देत असल्याच्या कारणातून मोहडेकरवाडी (ता. वाई) येथे सख्‍ख्‍या लहान भावाचा खून करण्यात आला. अजित रामचंद्र बांदल (वय ३८) याचा खून झाला असून मंगळवारी रात्री ही घटना घडली. दीपक रामचंद्र बांदल (४६) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या संशयित भावाचे नाव आहे.

मृत अजित बांदल याची पत्नी रेणुका बांदल (३८, रा. मोहडेकरवाडी) हिने फिर्याद दिली. अजित व दीपक यांच्‍यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. वडिलांना दारू पिऊन वारंवार त्रास देत असल्याच्या कारणातून त्यांच्यात भांडण होत होते. मंगळवारी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्‍यान या दोघा भावांमध्ये पुन्हा वाद झाला. हमरीतुमरी झाली. यामध्‍येच दीपक याने अजितला तुला आता जिवंत सोडत नाही, अशी धमकी देत त्‍याच्‍या डोक्‍यात लाकडी दांडक्‍याने मारले. या घटनेत अजित हा गंभीर जखमी झाला. यानंतर त्‍याला जिल्‍हा रुग्‍णालयात दाखल केले. मात्र, उपचारांदरम्‍यान अजित याचा मृत्‍यू झाला. कौटुंबिक वादातून घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

भुईंज पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल झाला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी एस. एस. साळुंखे आणि सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी भेट दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news